विदेशात द्विशतक झळकावणाऱ्या पहिल्या भारतीय क्रिकेटपटूला गुगलची मानवंदना

 

रायगड माझा वृत्त 

मुंबई: इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्ज इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुगलने भारताचे महान क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांच्या ७८व्या जयंतीनिमीत्त त्यांच्या आठवणी जागवल्या असून खास डूडल बनवून गुगलने सरदेसाई यांना मानवंदना दिली आहे. भारतीय क्रिकेटला १९७१मध्ये सरदेसाई यांनी एक वेगळे वळण दिले. तसेच, त्या काळात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या इग्लंड आणि वेस्ट इंडिज सारख्या संघाला त्यांच्याच मैदानावर पराभूत करण्याचीही खेळी करायलाही भारताने सरदेसाईंच्या काळातच सुरूवात केली.

 

गोव्यामध्ये ८ ऑगस्ट १९४०मध्ये जन्मलेल्या सरदेसाईंनी क्रिकेटमध्ये नाव कमावले. सरदेसाई यांना विदेशात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाते. सरदेसाई यांचे पूत्र आणि सुप्रसिद्ध पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एका मुलाखतीदरम्यान, म्हटले होते की, वयाच्या १७व्या वर्षांपर्यंतच्या आयुष्यात आपले वडील कधीही टर्फ विकेटवर खेळले नाहीत. गोव्यातून असा एकही क्रिकेटर त्यांच्या उदयापर्यंत पुढे आला नव्हता, जो भारताच्या आंतरराष्ट्रीय संघाचा घटक बनला. सरदेसाई यांनी भारतीय संघाकडून ३० टेस्ट सामने खेळले. दुहेरी शतकासह सुमारे ५ शतके त्यांच्या नावावर आहेत. त्यांना ‘द रेनासांस मॅन ऑफ इंडिया’ म्हणून विजय मर्चंड यांनी गौरवले. आंतरराष्ट्रीय सामने ज्या काळात मोठ्या प्रमाणावर खेळले जात नसत. त्यांनी ही कामगिरी त्या काळात केली आहे. डावखूरा फलंदाज असलेले सरदेसाई एक उत्कृष्ट गोलंदाजही होते. त्यांनी १९७२मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यांची आणखी एक खासीयत अशी की आपल्य एकूण कारकिर्दीत त्यांनी केवळ दोनच षटकार ठोकले. त्यांनी १९६१मध्ये आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात केली.

बडोद्यात राहणारी आपली गर्लफ्रेंड नंदिनी पंत हिला दिलीप सरदेसाई हे दररोज एक पत्र लिहीत असत. कालांतराने दोघांनी लग्न केले. त्या एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ होत्या. पुढे सेन्सॉर बोर्डाच्या नंदिनी अध्यक्षाही झाल्या. एका मुलाखतीत नंदिनी यांनी सांगितले होते की त्यांनी  एकमेकांना सुमारे १०० पत्र लिहीली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत