विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी करणा-या शिक्षकास नातेवाईकांनी काळे फासून चोपले

( रायगड माझा ऑनलाईन )

अमरावती- परीक्षेत ९० टक्के गुण देत उत्तीर्ण करतो तसेच शिष्यवृत्ती माफ करण्याचे आमिष दाखवत आदिवासी विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी करत विनयभंग करणाऱ्या लिपिकास मुलीच्या नातेवाइकांनी तंत्र विद्यालयातून बेदम मारहाण करत ठाण्यात नेल्याची घटना मंगळवार, जानेवारीला दुपारी पंचवटी परिसरात घडली. याप्रकरणी लिपिकाने विनयभंग केल्याची तक्रार स्थानिक गाडगेनगर पोलिस ठाण्यात नोंदवली. ही मुलगी मेळघाटातील असून, या प्रकरणात आणखी दोन कर्मचाऱ्यांची नावे विद्यार्थिनीने नोंदवलेल्या तक्रारीत नमूद आहे.

तक्रारीनुसार, मेळघाटातील विद्यार्थिनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्थानिक मोर्शी रोड स्थित वेलकम पाॅइंट ते डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय यांच्या दरम्यान असलेल्या जनता कृषी तंत्र विद्यालयात शिक्षण घेत आहे. परीक्षेचा अर्ज भरावयाचा आहे असे सांगत रविवार, जानेवारीला सुटीच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास विद्यालयात बोलावत आहे. परीक्षेत ९० टक्के गुण देत उत्तीर्ण करतो. तसेच शिष्यवृत्ती माफ करण्याचे आमिष दाखवत विद्यार्थिनीला शरीर सुखाची लज्जास्पद मागणी लिपिक बाबा इंगळेने केली. शिवाय हात पकडून ओढणी काढत विनयभंग केल्याची तक्रार विद्यार्थिनीकडून गाडगेनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी दाखल केली.

विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी करणा-या शिक्षकास नातेवाईकांनी काळे फासून चोपले

दोन दिवसांपूर्वी विद्यालयात घडलेला संपूर्ण प्रकार विद्यार्थिनीने घरच्यांना सांगितला. विद्यादानाचे पवित्र कार्य होणाऱ्या मंदिरात असा घृणास्पद प्रकार घडल्याने नातेवाईक तसेच युवकांनी थेट विद्यालय गाठले. नातेवाइकांसह काही युवकांनी लिपिक बाबा इंगळे यास विद्यालय परिसरात बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ताेंडाला काळे फासण्यासह लिपिकाच्या गळ्यात चपलांचा हार घातला. युवकांसोबत आलेल्या काही महिलांनी देखील लिपिक इंगळे याला चांगलाच चोप दिला. बाहेरून आलेल्या नागरिकांकडून अशा प्रकारे मारहाण करण्यात आल्याने विद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता.

या घटनेमुळे क्षुब्ध झालेल्या जमावाने लिपिक इंगळेला कपडे फाटेपर्यंत मारहाण तर केलीच, शिवाय त्याला एक किलोमीटर दूर असलेल्या गाडगेनगर पोलिस ठाण्यात मारहाण करतच नेले. विद्यालय ते पोलिस ठाणे असे चोप देत लिपिकास आणत असताना अनेकदा त्याने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र युवकांकडून त्याचे चेहऱ्यावर येणारे दोन्ही हात खाली खेचल्या जात होते. विद्यालयातून मुख्य रस्त्याने पंचवटी चौकात आणत असताना दुतर्फा बघ्यांची होती. पंचवटी चौकातून व्हीएमव्ही मार्गाने लिपिकास गाडगेनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. यादरम्यान सोबत असलेल्या महिला लिपिकाची अधून-मधून धुलाई करत असल्याचे चित्र होते. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून लिपिक बाबा इंगळे विराेधात गाडगे नगर पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६० च्या ३५४, ३५४ (अ) आणि ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात गाडगेनगर पोलिस कोणती भूमिका घेणार तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्था काय कारवाई करणार, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले.

वस्तुस्थिती बघणार

– हर्षवर्धन देशमुख, अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था.

कर्मचाऱ्या विरोधात विद्यार्थिनीकडून तक्रार देण्यात आली, ही वस्तुस्थिती आहे. या प्रकरणाची माहिती घेण्याकरिता संस्थेचे सचिव विद्यालयात गेले आहेत. कर्मचाऱ्यास देखील मारहाण करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती बघणार आहे. त्यानंतर कारवाई होईल.

विनयभंगाचा गुन्हा

मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर

सुटीच्या दिवशी रविवारी विद्यालयात बोलावून तसेच शरीर सुखाची मागणी केल्याची विद्यार्थिनीने तक्रार केली आहे. या प्रकरणात लिपिक अन्य दोन असा तिघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी असल्याने लिपिकास रुग्णालयात दाखल केले आहे.

लिपिक रुग्णालयात
जमावाने चोप दिलेल्या लिपिक बाबा इंगळेला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. जमावाच्या मारहाणीत जखमी झालेला इंगळे हा हृदयरोगी असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली.

अन्य दोघांवर एफआयआर
विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून लिपिक बाबा इंगळे आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. विद्यालयातीलच विल्हेकर नामक शिक्षक वारंवार छेड काढत असून, बांबल नामक शिपायाचा सहभाग असल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत