विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे -पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा तालुक्यातील अतीदुर्गम आणि डोंगराळ अश्या रायगड जिल्हा परिषदेच्या ठाकरोली येथील डिजीटल शाळा उद्घाटन आणि न्यास प्राधिकरण रायगड जिल्ह्या यांनी आयोजित केलेल्या ‘बेटी बचाव,बेटी पढाव’ या उपक्रमांतर्गत झालेल्या चित्रकला स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्याचा पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
तहसिलदार रामदास झळके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे,सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदिप चाचले,जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे,माजी उपसभापती मधुकर गायकर, गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक खेरटकर, पाष्टी केंद्रातील सर्व शिक्षक,बी.आर.सी. ग्रुप,ग्रामस्थ,महिला मंडळ आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक जनार्दन पजई यांनी प्रास्ताविकात शाळेचा संपूर्ण इतिहास,ग्रामस्थानचा सहभाग आणि शाळेचा शैक्षणिक,भौगोलिक विकास याबाबत सविस्तर माहिती दिली.सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदिप चाचले,माजी उपसभापती मधुकर गायकर आदि मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ग्रामस्थ व शाळेतील शिक्षक यांचे मनोमन कौतुक करून शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढविल्या बद्दल सर्वांना धन्यवाद दिले.
पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी सांगितले कि ठाकरोली सारख्या अतिदुर्गम भागातील विद्यार्थी एवढी प्रगती करू शकतो ही निश्चित पणे म्हसळ्यासाठी अभिमानाची बाब असून ग्रामस्थ व शिक्षक यांचे अश्यावेळी कौतुक होणे गरजेचे असल्याचे सांगितले. माणूस सर्व सोंग करू शकतो पण पैशाचे सोंग मात्र कोणालाही करता येत नाही.गावाची सोळा लाखाची भारत निर्माण योजना अपयशी झाली,त्यानंतर एक लाख रुपये खर्चून विंधन विहिरही अपयशी ठरून सुद्धा पाष्टी केंद्रप्रमुख,ठाकरोली शाळेतील सर्व शिक्षक आणि ठाकरोली येथील मुंबई व स्थानिक ग्रामस्थ यांनी चिकाटी न सोडता शाळेपासून सुमारे सातशे ते आठशे मीटर अंतरावर खोल दरीतून पाणी आणून अतिशय विधायक काम केले ही बाब अत्यंत अभिमानास्पद असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.
शासनाचा एकही पैसा न घेता ग्रामस्थानी शाळेपासून मुख्य रस्त्यापर्यंत एक किलोमीटर चा रस्ता ग्रामस्थानी अंग मेहनतीने तयार केला हीही बाब कौतुकास्पद असल्याचे सांगुन शाळा डिजीटल करण्यासाठी ग्रामस्थानी दिलेल योगदान स्मरणात राहण्यासारखे असल्याचे सांगितले. संगणीकीकरण झाल्यामूळे विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षण मिळनार असून विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केल्यास ते जगाच्या पाठीवर कुठेही उज्वल यश मिळवितील अशी आशाही कोल्हे यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय मार्गदर्शनात तहसीलदार रामदास झळके यांनी शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ यांच्यामुळेच ठाकरोली शालेचा सर्वांगीण विकास झाल्याचे सांगून असे शिक्षणाची आवड असणारे ग्रामस्थ क्वचितच सापडतात असे सांगून या ग्रामस्थाचा सर्वांनीच आदर्श घेण्यासारखा असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्याची गुणवत्ताही अतिशय चांगली असून चित्रकला स्पर्धेतील त्यांचे यश हे वाखाणन्यासारखे असल्याचे सांगितले.सूत्र संचालन धनेश अधिकारी यांनी केले.शरद कोद्रे,साळुंखे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत