विद्युत उपकेंद्राचा लोकार्पण मुरूड तालुक्यासाठी आजचा सोनेरी दिवस-आमदार पंडीतशेठ पाटील

मुरूड (अलिबाग) : अमूलकुमार जैन

मुरूड तालुक्यात गंभीर समस्या हि विजेची होती परंतू मी पाठपुरावा करून मुरूड येथे वीज उपकेंद्र उभारण्यासाठी प्रयत्न केले.या कामासाठी उर्जा मंत्री बावनकुळे यान भेटुन उपकेंद्राची मान्यता घेतली आणि आज त्या कामाचे लोकार्पण होत आहे.आजचा दिवस मुरूड तालुकाकरिता सोनेरी दिवस आहे.आसे मत यावेळीआमदार-पंडीतशेठ पाटील यांना वीज उपकेंद्र लोकार्पण या कार्यक्रमा वेळी बोलत होते.

यावेळी आमदार पंडीतशेठ पाटील  मुरूड नगरपरिषदचे बांधकाम सभापती- अशोक धुमाळ , शेकाप पक्षाचे तालुका चिटणीस- मनोज भगत , नगरसेवक – विश्वास चव्हाण , जिल्हा परिषद सदस्या- नम्रता कासार ,नगरसेविका- आरती गुरव , महिला व बाल कल्याण समिती सभापती- प्रांजली मकू , निता गिदी ,  उपकार्यकारी अभियंता मुरूड – सचिन येरेकर , सहाय्यक अभियंता – सुरज आबुर्ले , नगरसेवक- रहिम कबले  ,संजय देशमुख, नगरसेवक- आशिष दिवेकर, नगरसेवक-पांडुरंग आरेकर, मोतीराम पाटील ,तुकाराम पाटील , तालुक्यातील  आदिसह मान्यवर उपस्थित होते.

मुरूड जंजिरा नगरपरिषदचे बांधकाम सभापती- अशोक धुमाळ यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले.तर  आमदार-पंडीतशेठ शुभ हस्ते स्विच दाबुन करण्यात आले.

आमदार-पंडीतशेठ पाटील पुढे म्हणाले की या सबस्टेशन होण्यासाठी खुप आडचणी मात करून हा सबस्टेशन झाला.जे ७२ वर्षात जमलं नाही ते मी साडेचार वर्षात केले.या  तालुकासाठी अनेक कामे आणुन प्रगती पदावर आहात.नादगांव येथे धरण मंजुरी केला आहे.मुरूडला फिलटर पाणी मिळवण्यासाठी मी प्रयत्न केल.आता तालुक्यातील वीज समस्या कायमस्वरूपी मिटली आहे.याचा सार्थ अभिमान आहे.उर्जा मंत्री- बावनकोळी व केंद्रीय मंत्री – अनंत गिते यांचा आभार यावेळी व्यक्त केले.

उपकार्यकारी अभियंता मुरूड – सचिन येरेकर प्रस्तावित करताना म्हणाले की मुरूडसाठी धाटावा पासुन आपली लाईन होती.परंतू दिवसा दिवस लोढ वाढत गेला तशी वीजेची समस्या वाढत गेली.याठिकाणी वीज उपकेंद्र होणे जरूरी होता.त्याकरिता आमदार-पंडीतशेठ पाटील यांच्या प्रयत्नाने हा वीज उपकेंद्र झाल.आता मुरूड तालुकाकरिता वीजे समस्या होणार नाही.या वीज उपकेंद्र करिता  आडीच ते तीन कोटी खर्च झाला आहे.पाबरा पासुन ते मुरूड पर्यत ४०किलोमीटर असुन ही लाईन ३३केबी आहे.याठिकाणी  तीन स्वीच आसणार आहे.मुरूड शहर , शिघ्रे- आगरदांडा- भालगाव, नादगांव- कोकण आसणार आहे.कुठेही वीज बंद पडली तर ताबडतोब होणार आहे.तरी वीजे पासुन मुरूड मुक्त झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत