विद्युत केबल टाकताना शेतकर्‍यांचे नुकसान

महावितरणाकडुन नुकसान भरपाईची शेतकर्‍यांची मागणी

नेरळ : कांता हाबळे

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कर्जत-मुरबाड मार्गालगतच्या शेतजमिनीच्या बाजूने महावितरण कंपनीचे जमिनीखाली केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. जमिनीखालून केबल टाकण्याचे काम करत असताना शेतीचे शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महावितरणाने झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी वारे येथील शेतर्‍यांनी केली आहे. 

कर्जत-मुरबाड राज्यमार्गालगत वार- खैरपाडा गावाजवळ महावितरणचे २२ किलोवॅटचे नवीन सबस्टेशन उभारले आहे. त्यासाठी केबल कर्जत मुरबाड राज्यमार्ग ३८ लगत असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतजमीनितून टाकण्याचे काम सुरु आहे. २२ किलोवॅट सबस्टेशनच्या उभारणीमुळे परिसरातील गावातील वीज वितरण व्यवस्थित सुधारणा होणार आहे. तसेच परिसरातील वारंवार खंडित होणार्‍या वीजपुरवठा सुरळीतपणे होणार या भावनेने शेतकर्‍यांनी महावितरण कंपनीच्या ठेकेदारास सहकार्य केले, परंतु काही ठिकाणी शेतकर्‍यांच्या रहदारीच्या रस्त्यावर केबल एक दोन फूट जमीन खोदुन तर काही ठिकाणी जमिनीवर, पावसाळी वाहणाऱ्या नाल्यातून केबल टाकण्यात आली आहे. त्यामुळे शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरने, नांगरणी करणे धोक्याचे होऊ शकते, अशी भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे.
पावसाळा जवळ आल्याने ठेकेदारचे नियमबाह्य व नियोजन शून्य काम सुरू असून त्यासंबंधी तक्रारी महावितरणकडे करून ही दुर्लक्ष करून ठेकेदार कंपनीकडून काम सुरूच ठेवल्याने शेतकर्‍यांकडून संताप व्यक्त होत आहे.
महावितरणच्या कामामुळे आमच्या शेतीचे नुकसान होणार आहे, आम्हास जमीन विकसित करायला अडचणीचे होणार असून जमिनीचे व्हॅल्युएशन कमी होईल, त्यामुळे संबंधित विभागाने आम्हा शेतकर्‍यांना होणारी नुकसान भरपाई द्यावी.  भगवान म्हसे- सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत वार
विद्युत केबल टाकताना ज्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. त्यांच्या तक्रारींचे निवारण करून जमिनीवरून जाणार्‍या ओवरहेड लाइन काढून  त्या जमिनी खालून टाकण्याचे काम सुरू केले आहे. 
-सचिन निकम- प्रॉजेक्ट इंजीनियर,ए.टी.इलेक्ट्रिक कंपनी प्रा.लि.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत