विधानपरिषदेसाठीच्या ११ जागांची निवडणूक अखेर बिनविरोध

जयंत पाटील -महादेव जानकर यांचा जीव भांड्यात 

 

नागपूर :रायगड माझा

विधानपरिषदेच्या ११ जागांची निवडणूक अखेर बिनविरोध होणार आहे. ११ जागांच्या निवडणुकीसाठी एकूण १२ अर्ज आल्याने ही निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार भाजपतर्फे पृथ्वीराज देशमुख हे उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. बाराव्या अर्जामुळे महादेव जानकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यासाठी धाकधूक वाढली होती मात्र देशमुख यांच्या अर्ज मागे घेण्याच्या शक्यतेने जयंत पाटील -महादेव जानकर यांचा जीव भांड्यात पडला आहे.

आज निर्णय जाहीर..

दरम्यान भाजपाच्या केंद्रीय संसदीय समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला जाणार आहे. विधानपरिषदच्या निवडणुकीसाठी ९ जुलै म्हणजे सोमवार हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवस आहे. भाजपाच्या या निर्णयामुळे महादेव जानकर यांना दिलासा मिळणार आहे. कॅबिनेट मंत्री असलेले जानकर यांनी भाजप ऐवजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर परिषदसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.