विधानसभा उपाध्यपद आणि उपसभापती पद शिवसेनेच्या गळ्यात मारण्याचे जवळपास नक्की!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मागील चार वर्षापासून रिक्त असलेले विधानसभा उपाध्यपद शिवसेनेच्या गळ्यात मारण्याचे जवळपास नक्की झाले असून, भाजपने शिवसेनेला युतीच्या बेडीत आडकावण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

मागील चार वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत शिवसेना सरकारमधे सहभागी आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सत्तेत राहून टीका करण्याची एकही संधी सोडली नाही, तरीही आलिकडेच शिवसेनेने महामंडळावर वर्णी लावून घेतली, तर राम मंदिराच्या मुद्यावर भाजपने कायदा केला तर शिवसेना सोबत असेल अशा आशयाचे वक्तव्य केल्यामुळे शिवसेना अखेर भाजप सोबत युती करेल असा कयास बांधल जात असताना उपाध्यक्ष शिवसेनेला देण्यचे जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जाते.

बदललेल्या राजकीय वातावरणात शिवसेने बरोबरची यूती भाजपला हवीच आहे. हे भाजपच्या अमित शहा यांच्यापासून ते रावसाहेब दानवे यांच्यापर्यत सर्व नेत्यांनी युती व्हावी असे म्हटले आहे. त्या दिशेने उपाध्यक्षपद देऊन युती घट्ट करण्याचा प्रयत्न भाजपचा रहणार आहे. मात्र सेनेला त्याचा राजकीय लाभ किती होणार हे सांगता येणार नाही, आता जेमतेम एक वर्षाचा कालावधी उरला असून एक अधिवेशन होईल. विधानसभा उपाध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर झाला असून उद्या (ता.29) 11 पर्यंत अर्ज भरण्याचा कालवधी आहे. विधानसभेत भाजप 123 आणि शिवसेना 63 यांचे संख्याबळ विरोधकांपेक्षा तगडे असल्याने ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सेनेतर्फे विजय औटी यांचे नाव आघाडीवर असले तरीही संजय शिरसाठ, सुभाष साबणे यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. विरोधकांनी उमेदवार दिला तर निवडणूक परवा (ता. 30)  होऊ शकते. मात्र ही शक्यता धुसर आहे.

उपसभापतीपदी निलम गोऱ्हे?
उपसभापतीपदाच्या निवडीचा कार्यक्रम उद्या घोषित होण्याची शक्यता असून निवडणूक होण्याची शक्यता असून या पदावर शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांची निवड होण्याची शक्यता आहे. तरीही या पदासाठी निलमताई यांच्यासह सेनेचे गोपीकिशन बजोरीया हे देखील अर्ज दाखल करू शकतील. श्रीकांत देशपांडे अपक्ष म्हणून अर्ज दाखल करू शकतील. त्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता असली तर या दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्याकडे सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न असेल. सध्या भाजप 22, शिवसेना 12, काँग्रेस 17, राष्ट्रवादी काँग्रेस 17, शेकाप 1, लोकभारती 1 असे बलाबल आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत