विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर

मुंबई : रायगड माझा 

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 16 जुलैला निवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिलीय. 27 जून रोजी रिक्त होणाऱ्या पदांसाठी ही निवडणूक होणार आहे.

विधान परिषदेचे सदस्य जयदेवराव गायकवाड, विजय गिरकर, माणिकराव ठाकरे, संजय दत्त, अनिल परब, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडित, शरद रणपिसे, सुनील तटकरे, महादेव जानकर आणि जयंत पाटील यांचा कार्यकाळ येत्या 27 जुलै रोजी पूर्ण होत आहे.

16 जुलै या दिवशी होणाऱ्या मतदानाचा निकाल त्याच दिवशी लागणार आहे. सायंकाळी 5 नंतर मतमोजणी होईल, असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत