विधान परिषदेत शिवसेना-भाजप युती नाहीच, निर्णय स्थानिक पातळीवर: उद्धव ठाकरे

नाशिक: रायगड माझा 

 

अामचे उमेदवार निवडून येतील त्या तीन जागांवर अाम्ही विधान परिषद निवडणूक लढवत अाहाेत. ही निवडणूक संख्याबळावर होईल. मतदान वाढवण्यासाठी काेणाला बराेबर घ्यायचे याचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

भाजपचे जेथे उमेदवार तेथे प्रारंभी निरीक्षण
विधान परिषद निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार अाहेत तेथे काय भूमिका घ्यायची याचा निर्णय तेथील घडामाेडींचे काही दिवस निरीक्षण करून घेण्यात येईल. हा निर्णयदेखील स्थानिक पदाधिकाऱ्यांवरच साेपवण्यात अाल्याचे ठाकरे म्हणाले.

विधान परिषद निवडणुकीत वरिष्ठ पातळीवरून सेना-भाजप युती झाली नसल्याचे स्पष्ट करतानाच यापुढील काेणतीही निवडणूक शिवसेना स्वतंत्रपणेच लढवेल, अशी पुनरुक्ती त्यांनी केली.शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी उद्धव नाशिकमध्ये होते. विधान परिषद निवडणुकीतील भाजपसोबतच्या युतीबाबत ते म्हणाले की, कल्याण-डाेंबिवलीसारख्या ठिकाणी यापूर्वीच युती जाहीर झालेली अाहे. त्या ठिकाणी टर्म पूर्ण हाेईपर्यंत अाम्ही शब्दाला बांधील अाहाेत. येत्या काळातील निवडणुका मात्र अाम्ही स्वबळावरच लढवणार अाहाेत.विधान परिषद निवडणुकीत ज्या तीन ठिकाणी अामचे संख्याबळ अधिक अाहे तेथे शिवसेनेने उमेदवार दिला अाहे. नाशिकमध्ये अाम्ही विजयी हाेण्याची शक्यता असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांना मतांची समीकरणे जुळवण्याचे सर्व अधिकार दिल्याचेे ठाकरे म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत