विधान परिषद निवडणूक: व्‍यूहरचना ठवरण्‍यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा

मुंबई : रायगड माझा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्यासाठी सोमवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत पालघर आणि गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सुनील तटकरे, मधुकर चव्हाण, बसवराज पाटील आदी या बैठकीत सहभागी झाले होते. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, परभणी-हिंगोली, अमरावती तसेच उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी तीन जागा लढवत आहे. त्याचप्रमाणे पालघर व भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीतही दोन्ही पक्षांनी आघाडी केली असून दोघे प्रत्येकी एक-एक जागा लढवत आहेत. बैठकीत विधान परिषद आणि लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. मतदारसंघातील अडचणीसंदर्भात जबाबदारी निश्चित करण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत