विधायक कामे केली तर कोण कशाला बोलतील :- नौशाद दळवी 

मुरुड – अमूलकुमार जैन 

गावाच्या विकासासाठी होत असलेल्या विधायक कामांना अडकाठी निर्माण केल्यास ग्रामस्थ हे विरोधात बोलणारच.असे प्रतिपादन बोर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे उमेदवार नौशाद दळवी यांनी प्रचार फेरीच्या वेळी केले.

विरोधकातील काही उमेदवार प्रचार करीत असताना सांगतात की दीड दिवसाचे गणपती काय करणार?मात्र त्यानी एक गोष्ट लक्षात घ्यावी की,राजकारण करीत असताना देव देवतांना मध्ये आणून त्यांची बदनामी करणे चुकीचे आहे.दीड दिवस येणारे हे दीड वर्षाचे विधायक कामे करून जातात. त्याचप्रमाणे विधायक काम करीत असताना ग्रामस्थांना चांगला सल्ला ही देत असतात. गावात कधीही भांडणे लावून जात नाही.
 सार्वजनिक समस्येवर कोणीही ग्रामस्थ तक्रार घेऊन गेला तर त्याच्याकडून अर्ज घेतला जातो.नतंर तो अर्ज विरोधक याला दाखवून आपसात भांडणे लावील जातात. आणि  हे मात्र त्याचा आनंद घेत बघत बसतात.असे किती दिवस  करीत बसणार.गाव आमचे आहे तसे तुमचे सुद्धा आहे.गावासाठी विधायक कार्य केले तर कोणीही तुम्हाला विरोध करणार नाही.काँग्रेस पक्षाचे भालचंद्र भोईर हे  मुरूड पंचायत समितीचे सभापती असताना त्यांनी बोर्ली गावातील मुस्लिम समाजाचे कब्रस्तान साठी संरक्षण भिंतीचे काम आणले होते.त्यावेळी ग्राम पंचायत ही शिवसेनेच्या ताब्यात होती.त्यावेळी गावात विधायक काम होत आहे.ते कोणाच्याही माध्यमातून होऊन दे त्यासाठी आम्ही विरोध केला नाही.विधायक कामात अडचणी निर्माण कशासाठी करायचे. अडचणी निर्माण केल्यास गावाचा विकास खुंटतो.असे मत देखील नौशाद दळवी यांनी व्यक्त केले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत