विधिमंडळात भाजप आमदार ‘मी पण सावरकर’ लिहिलेल्या टोप्यांमध्ये…

नागपूर : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

‘मी सावरकर नाही, मी माफी मागणार नाही,’ असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. याचा भाजपने देशभरात निषेध नोंदवला. आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. पहिल्या दिवशीपासूनच सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही याचे पडसाद पहायला मिळत आहेत.

विधिमंडळात भाजप आमदार आज ‘मी पण सावरकर’च्या टोप्या घालून दिसले.  राहुल गांधींनी हे सांगून बरं केलं की ते सावरकर नाहीत. पण या देशातील प्रत्येकाला स्वत:चे नाव सावरकरांसोबत जोडून घेतल तर ते भाग्य असेल. काँग्रेस वाल्यांना स्वत:चं नाव सावरकरांसोबत जोडून घ्यायला लाज वाटत असेल तर आम्हाला ‘मी पण सावरकर’ लिहीलेल्या टोप्या घालताना अभिमान वाटत असल्याचे भाजप आमदारांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत