विनापरवाना बनावट सौंदर्य प्रसाधन विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुंबईमध्ये विविध ठिकाणी विनापरवाना बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री केली जाते. या बनावट सौंदर्य प्रसाधनांचा वापर वाढता आहे, हे लक्षात घेऊन राज्याच्या एफडीएने बनावट सौंदर्य प्रसाधन विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे.

स्वस्तात मिळणाऱ्या या सौंदर्य प्रसाधनांचा दर्जा चांगला नसतो. त्यामुळे अनेक मुली तसेच महिलांना त्वचेचे विकार होतात. एफडीएकडे सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या कंपन्यांवर अंकुश ठेवण्याचा अधिकार आहे, मात्र या सौंदर्य प्रसाधनांची विक्री करण्यावर नियंत्रण नसल्यामुळे या बनावट सौंदर्य प्रसाधनांची वारेमाप विक्री होते. त्यातून त्वचाविकार उद्भवतात. अनेक नामांकित ब्रॅण्डच्या कंपन्यांच्या नावाखाली दुय्यम दर्जाची उत्पादने विकली जातात. या उत्पादनांचा दर्जा तपासण्याची गरज असते. या बनावट सौंदर्य प्रसाधनांच्या किंमतीही कमी असल्याने या गोष्टी विकत घेतल्या जातात. पण या सौंदर्य प्रसाधन विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्याचा अधिकार एफडीएला नाही. त्यामुळे आता सौंदर्य प्रसाधन विक्री करणाऱ्या दुकानदारांनी नोंदणी करायची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय विक्रेत्यांना परवानाही बंधनकारक करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत