विनायक मेटेंना हवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद

महाराष्ट्र News 24 वृत्त

गेले अनेक वर्ष भाजपशी सूत जुळवून घेणाऱ्या शिवसंग्रामने आता मात्र भाजपला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.विनायक मेटे  विधान परिषदेत ज्येष्ठ व अनुभवी आमदार असल्याने भाजपने त्यांना  विरोधी पक्षनेता केले पाहिजे. मंत्रिपदासाठी डावलणाऱ्या  भाजपने आता तरी आमच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी शिवसंग्रामने केली आहे.

शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरु सभागृह येथे झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तानाजी शिंदे, आमदार डॉ. भारती लव्हेकर,  विक्रांत आंब्रे आदी यावेळी उपस्थित होते.

‘विधानपरिषदेत भाजपा विरोधीपक्षात बसल्याने विरोधी पक्षनेते पदाची निवड करावी लागणार आहे. विधान परिषदेत भाजपाचे जे मित्रपक्ष आहेत, त्यामध्ये मी ज्येष्ठ व अनुभवी सदस्य आहे. त्यामुळे विरोधीपक्ष नेते पद मला मिळाले पाहिजे असा विनायक मेटेंचा आग्रह असून यासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार असताना शिवसंग्रामवर अन्याय झाला. त्यामुळे आता तरी विरोधीपक्षनेते पदाची संधी देऊन हा अन्याय दूर केला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे.

अगोदरच विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपामध्ये मोठी चढाओढ असताना आता शिवसंग्राम संघटनेने ही मागणी करून भाजपच्या अडचणीत वाढ केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत