विराटला वरचढ होऊ देऊ नका: रिकी पाँटिंग

रायगड माझा वृत्त

अॅडलेड : विराट कोहलीला अडचणीत आणता येऊ शकते, मात्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्याला वरचढ होण्याची संधी देऊ नये, असा सल्ला ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने दिला आहे. भारतीय संघाच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये विराटने यशस्वी कामगिरी करताना ८६.२५ च्या सरासरीने ६९२

धावा केल्या होत्या. यावेळीही तो त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक असेल. मात्र, मी त्याला अडचणीत सापडलेले पाहिले आहे. मिचेल जॉन्सनने त्याला जखडून ठेवले होते. त्याच्या धावांचा ओघ थांबवता येऊ शकतो. मात्र, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्याला वरचढ होऊ देऊ नये. ऑस्ट्रेलियन संघाने मैदानावर सकारात्मक देहबोली ठेवली, तरच ऑस्ट्रेलिया सर्वोत्तम क्रिकेट खेळू शकेल, असे पाँटिंग म्हणाला.

अव्वल क्रमांकासाठी

दुबई ः सध्या आयसीसीच्या सांघिक कसोटी क्रमवारीमध्ये अग्रस्थानी असलेल्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत हे स्थान टिकवण्याची चांगली संधी आहे. चार कसोटींच्या या मालिकेत भारताने एक जरी कसोटी अनिर्णित राखली, तरी भारताचे अग्रस्थान अबाधित राहील.

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या क्रमवारीत पाचव्या स्थानी आहे. भारताच्या खात्यात ११६, तर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात १०२ गुण आहेत. ही मालिका ऑस्ट्रेलियाने ४-० अशी एकतर्फी जिंकली, तरच भारत अग्रस्थानावरून दूर होईल. असे झाल्यास ऑस्ट्रेलिया ११० गुणांसह पहिल्या, तर भारत १०८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचेल. दुसरीकडे, भारताने मालिका ४-० अशी जिंकल्यास भारताचे १२०, ऑस्ट्रेलियाचे ९७ गुण होतील. ऑस्ट्रेलियने ही मालिका ३-० अशी जिंकल्यास भारत १०९ गुणांसह अग्रस्थानी कायम राहील, तर ऑस्ट्रेलिया १०८ गुणांसह तिसऱ्या स्थानी पोहोचेल. ऑस्ट्रेलियाने मालिका ३-१ अशी जिंकली, तर त्यांच्या खात्यात १०७, तर भारताच्या खात्यात १११ गुण जमा होतील. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यास ६ डिसेंबरपासून अॅडलेड येथे सुरुवात होणार आहे.
…..

अश्विनबाबत पुजाराला विश्वास

अॅडलेड : भारताचा अनुभवी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर यशस्वी ठरेल, असा विश्वास भारताचा कसोटीवीर चेतेश्वर पुजाराने व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अश्विनच्या उपयुक्ततेवर उपस्थित होणाऱ्या प्रश्नचिन्हाच्या पार्श्वभूमीवर पुजाराने हे मत व्यक्त केले.

अश्विनला आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ६ कसोटींमध्ये केवळ २१ विकेट घेता आल्या असून त्याची येथील सरासरी ५४.७१ इतकी आहे. एकूण कसोटी कारकिर्दीत मात्र अश्विनने २५.४४ च्या सरासरीने ३३६ विकेट घेतल्या आहेत. तथापि, इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटमध्ये खेळल्यामुळे अश्विनच्या आत्मविश्वासात वाढ झाली असल्याचे पुजाराने सांगितले. ‘मी नेहमीच सांगत आलो आहे की अश्विन हा चाणाक्ष गोलंदाज आहे. फलंदाजाच्या शैलीविषयीचे त्याचे आकलन खूप चांगले आहे. गेल्या काही काळात त्याने आपल्या गोलंदाजीध्ये बरेच बदल केले आहेत. त्याचा फायदा त्याला आगामी मालिकेत होईल, असे पुजारा म्हणाला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत