विराट कोहलीने मानले जाहिरातीचे आभार; व्यक्त केल्या भावना

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

विराट कोहली आणि अनुष्का शर्माची लव्हस्टोरी ही प्रत्येकाला भावणारी असून त्याचा प्रवास अनोखा आहे. विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सगळ्या सामन्या मैदानावर पाहायला मिळाली. विराट कोहलीने अनुष्कासोबतची पहिली भेट आणि तेव्हांच्या भावना एका मुलाखतीत व्यक्त केल्या आहेत. एका शॅम्पूच्या जाहिराती संदर्भात विराट आणि अनुष्काची पहिली भेट झाली होती.

पहिल्या भेटीतील कोहलीला आवडलेली बाब म्हणजे, अनुष्काने त्याचं खूप चांगल स्वागत करून त्याला रिलॅक्स केलं. यामुळे त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाल्याचं विराट सांगतो. या मुलाखतीच्या निमित्ताने विराट कोहलीने शॅम्पू जाहिरातीचे आभार मानले आहेत. कारण त्यांच्यामुळे विराटला अनुष्का भेटली. मला हसत खेळत काम करायला आवडतं आणि त्या जाहिरातीच्या स्टेजवरील वातावरण देखील तसंच काहीसं होतं. मी पहिल्यांदा अनुष्कासमोर खूप गमतीशीर जोक मारत होतो, असं कोहली सांगतो. एवढंच नाही तर विराट आज जे समतुदारपणे वागतोय त्याचं सगळं श्रेय तो अनुष्काला देतो. अनुष्काच्यासोबतीने विराट कोहली आणखी जबाबदार झाल्याचं सांगतो. त्याचप्रमाणे अनुष्काच्या भेटीनंतर त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलल्याचं देखील सांगतो.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत