विरोधकांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून सरकारचे टोचले कान!

नागपूर : रायगड माझा वृत्त 

नागपुरात उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधकांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून सरकारचे कान टोचले आहेत. पत्रकार परिषदेच्या बॅनरवर ही कार्टूनबाजी करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे फिस्कटलेले चॅलेंज आणि महाराष्ट्राचा दुर्भाग्य योग असा विषय घेऊन विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. विशेष म्हणजे शाब्दिक बाण चालवण्याऐवजी व्यंगचित्रांचा माध्यमातून सरकारवर निशाणा साधण्याचा पर्याय विरोधकांनी निवडला आहे.शेतकरी कर्जमाफी, युतीमधली धुसफूस, नाणार, रोजगार अशा विविध विषयांना घेऊन विरोधकांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे.

नागपुरात उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पहिल्यांदाच नागपुरात पावसाळी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. अधिवेशनात कोण-कोणावर बरसणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत