मुंबई :रायगड माझा
नेतृत्व आपल्याकडे नसेल तर तिसरी आघाडी ‘प्रॅक्टिकल’ नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून शरद पवार आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
भाजपला जे बोलायचे ते विरोधी पक्षाकडून वदवून घेतले जात आहे. शरद पवारांचा ‘सडेतोड’ बाणा त्याच पठडीतला असेल तर विरोधकांनी सावध राहायला हवे, असं अग्रलेखातून म्हटलं आहे.
दरम्यान, गुजरात आणि कर्नाटकात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी आणि भाजपला घाम फोडला, हे सत्य विरोधक जेवढ्या लवकर स्वीकारतील तेवढं लोकशाहीसाठी बरं होईल, असा सुचक टोलाही लगावला आहे.