विवाहितेचा छळ ; चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल

नागोठणे – महेंद्र म्हात्रे

No automatic alt text available.दोन लाख रुपये तसेच मोटारसायकल मिळावी यासाठी महिलेचा छळ करून जाच केल्याप्रकरणी विवाहीत महिलेने नागोठणे पोलीसठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर देवर्णा हंबीर (२६) हिचे पती किरण हंबीर तसेच सासरे चंद्रकांत हंबीर, सासू निरा हंबीर (सर्व रा. वासगाव) आणि मधुकर लेंडी (रा. वेलशेत) या चौघांच्या विरोधात भादंवि कलम ४९८/ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवर्णा हिचा किरण हंबीर बरोबर १२ नोव्हेंबर २०१७ ला विवाह झाला असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुरेश भालेराव हे करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत