विवाहितेचा छळ प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा

In the case of marital affair, crime against three people | विवाहितेचा छळ प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा

नंदुरबार : रायगड माझा वृत्त

चारित्र्याचा संशय घेवून व घर घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावे यासाठी वाघाळे येथील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी वालवे, ता.साक्री येथील तीन जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघाळे, ता.नंदुरबार येथील उषा दिलीप कडवे या विवाहितेला तिच्या सासरची मंडळींनी नाशिक व वाघाळे येथे छळ केला. चारित्र्याचा संशयावरून आणि माहेरून घर घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावे यासाठी 2013 पासून छळ सुरू होता. मारहाण करून मारून टाकण्याची धमकी दिली जात होती.

या छळाला कंटाळून उषा दिलीप कडवे यांनी तालुका पोलीस     ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दिलीप राजमज कडवे, नंदाबाई  दिलीप पवार, रामचंद्र राजमल    कडवे सर्व रा.वालवे, ता.साक्री यांच्याविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार कानडे करीत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत