विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा

सातारा :  रायगड माझा 

शिरसवडी, ता. खटाव येथील विवाहिता मिनाक्षी नानासो इंगळे (वय 40) हिस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चार जणांच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

छायाचित्र ;संग्रहित

याबाबत मयत मिनाक्षी हिचे बंधू भाऊसाहेब बापूराव माने यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, मिनाक्षी व शिरसवडी येथील नाना इंगळे यांचा विवाह 1996 साली झाला होता. तिला लग्नानंतर काही दिवस व्यवस्थित नांदवले गेले. दरम्यानच्या काळात दोन मुले व एक मुलगी झाली. तद्‌नंतर तू सारखी आजारी असते, असे म्हणत किरकोळ कारणावरुन सासरच्या लोकांकडून जाचहाट सुरु झाला. त्यानंतर तू माहेरी जावून उपचार घेवून परत ये असे सांगण्यात आले. मिनाक्षी उपचारासाठी आली असताना तिची संमती न घेता पतीने राजाचे कुर्ले येथील दुसऱ्या महिलेबरोबर विवाह केला. या कारणावरुन मिनाक्षीने वडूज न्यायालयात पोटगीचा दावा दाखल केला. 2001 मध्ये या दाव्यात तडजोड होवून शिरसवडी येथील जमीन मिनाक्षी हिला कसण्यास देण्यात आली. ही तडजोड कायम इंगळे यांना सलत असल्याने मिनाक्षी हिस वारंवार उपाशी ठेवण्याबरोबरच शेतीच्या व कामाधंद्याच्या कारणावरुन कुटुंबिय जाचहाट करत होते. या जाचहाटास कंटाळूनच तिने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. या आत्महत्येस पती नानासो इंगळे, सासरे विष्णू इंगळे, सासू सोनाबाई व सवत वंदना हे चारजण कारणीभूत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत