उंब्रज :रायगड माझा
घरात कुणी नसल्याचा फायदा घेऊन जिवे मारण्याची धमकी देत एका विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी धायटी, ता. पाटण येथील एकावर उंब्रज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 30 एप्रिल रोजी गावातील किरण शिवाजी चन्ने याने घरात कोणी नसल्याचा फायदा उठवत रात्री साडे अकरा वाजण्याचे सुमारास घराबाहेर येऊन दार वाजवले व महिलेने दार उघडताच तिचे तोंड दाबून तिला हाताने मारहाण केली. व दार लावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. याबाबत पीडित महिलेने उंब्रज पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. संशयित किरण चन्ने वारंवार त्रास देत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या घटनेची नोंद उंब्रज पोलीसात झाली असून अधिक तपास शिंदे करीत आहेत.
शेयर करा