विश्वजीत कदम यांनी आमदारकीची शपथ घेतली

मुंबई  :  रायगड माझा

पलूस-कडेगाव मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आले आहेत. विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली.

स्वर्गीय  पतंगराव कदम यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती . यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे उपस्थित होते.

या शपथविधी सोहळ्याला लोकसभा सदस्य अशोक चव्हाण, विधानपरिषदेचे सदस्य शरद रणपिसे, मोहनराव कदम, जयंत पाटील, आनंदराव पाटील, हरिभाऊ राठोड,  अमरनाथ राजूरकर, हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेचे विद्यमान सदस्य तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सदस्य सर्वश्री जयंत पाटील,सुनिल तटकरे,  डी.पी.सावंत, डॉ. सतेज पाटील, गोपालदास अग्रवाल, सुनिल केदार, प्रणिती शिंदे विधीमंडळाचे सदस्य, यावेळी उपस्थ‍ित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत