विहूर हल्ल्याप्रकरणी इरफान पांगारकर याला सात वर्षे कारावास     

मुरूड  : अमूलकुमार जैन

मुरूड तालुक्यातील विहूर येथील हल्ल्याप्रकरणी आरोपी इरफान निसार पांगारकर यास अलिबाग सत्र न्यायालयाने सात वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
मुरूड तालुक्यातील विहूर उलदे मोहल्ला येथे  19 जुलै2011 रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास फिर्यादी सुलतान युसुफ उलदे हे झोपलेले असताना त्यांच्या मोहल्ल्यात आरडाओरडा आणि मोठ्याने आवाज आल्याने काय झाले आहे हे पाहण्यासाठी ते घराबाहेर येऊन आवाजाच्या दिशेने त्यांच्या मामाच्या घरी गेले.तेथे दानिश उलदे यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजवीत असल्यामुळे व निसार पांगारकर यांचा मुलगा जदीद पांगारकर याने शिवीगाळ केली त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली असल्यामुळे जमाव झाला असल्याचें मासूम उलदे यांनी फिर्यादी सुलतान उलदे यास सांगितले.त्यावेळी तेथे सर्व आरोपी आले.त्यावेळी फिर्यादी हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपी सलफ पांगारकर याने त्याच्या हातातील दगडाने फिर्यादीच्या डोक्यास दुखापत केली. व त्याच्या हातात असणाऱ्या तलवार व चैन ने डाव्या हातास आणि उजव्या खांद्यास दुखापत केली म्हणून सर्व आरोपी विरुद्ध मुरूड पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 307,324,336,147,148,149,504,506,सह कलम34व मुंबई पोलीस अधिनियम37(1)(3)/135 नव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी अलिबाग येथील सत्र न्यायालयाने याबाबत शासकीय अभियोक्ता ऍड. स्मिता धुमाळ-पाटील यांनी योग्य युक्तीवाद आणि पुरावे सादर केले. दोन्ही बाजूकडील साक्षी पुरावे पाहून  आरोपी इरफान निसार पांगारकर यास भा.द.वि.कलम 307नव्ये पाच वर्षे सश्रम कारावास आणि पाचशे रुपये,व324नव्ये दोन वर्षे सश्रम कारावास आणि पाचशे रुपये अशी शिक्षा सुनावली आहे.हा खटला जवळपास सात वर्षे सुरू होता या खटल्याच्या निकालाकडे मुरूड परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत