वीज कंत्राटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आ.अनिकेत तटकरे यांना निवेदन

कोलाड : कल्पेश पवार

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेचे प्रलंबित प्रश्न सोडवून न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी रायगड जिल्हा वीज कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदेश लोखंडे यांनी कामगारांच्या वतीने आ.अनिकेत तटकरे यांना निवेदन दिले आहे .

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये उन्हा-तानाची,पाऊस पाण्याची परवा न करता कायमस्वरूपी कामगाराच्या सोबतच गेली बरीच वर्षे कंत्राटी कामगार प्रामाणिक पणे सेवा करीत आहेत.परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही त्यांना बेसिक पगार किती,टॅक्स किती कटतो ,पी एफ कटिंग किती होतो ,किंवा होतो की नाही यांची माहिती मिळत नाही .तसेच,त्यांना ना कोणती पेमेंट स्लिप,ना आयकार्ड ,या कामगारांचा पगार ही तुटपुंज्या असून तोही कधीच वेळेवर मिळत नाही.त्यामुळे अच्छे दिन आणणाऱ्या या सरकारच्या कारकिर्दीत सुध्दा वीज कंत्राटी कामगारांवर बुरे दिन आले आहेत .

त्यामुळे वीज वितरण कंपनी मध्ये कंत्राट पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत समाहून घ्यावे ,समान काम समान वेतन देण्यात यावा,पूर्वी प्रमाणेच रोजदारी पद्धत चालू करावी,या प्रमुख मागण्याचा विचार होऊन कंत्राटी कामगारांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी ,महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश लोखंडे यांनी कामगारांच्या वतीने आ.अनिकेत तटकरे यांना निवेदन देऊन केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत