वृक्षांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ!

म्हसळा : निकेश कोकचा 

बहिण भावाच्या पवित्र नात्यांला भरारी देणाऱ्या रक्षाबंधन दिनी म्हसळा तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कूल ,नेवरूळ या शाळेतील विद्याथ्यानी अगळावेगळा रक्षाबंधन साजरा केला. यावेळीशाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी परिसरातील वृक्षांना राखी बांधून वृक्षांसहीत पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ घेतली.
न्यु इंग्लिश स्कूल नेवरूळ या शाळेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील मुलींनी उपस्थित मुलांना राखी बांधून गोड खाऊचे वाटप केले. यांनंतर नविन उपक्रम सादर करीत परिसरातील वृक्षांना राखी बांधून वृक्ष व पर्यावरणाच्या रक्षणाची शपथ घेतली.
बहिण आपल्या भावाला राखी बांधून जशी संरक्षण करण्याची हमी मागते तसे आपण सर्वांनी आपल्या परिसरात येणारे प्रत्येक वृक्ष हे आपले मित्र, भाऊ आहेत ही भावना ठेऊन त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे असे मत श्री पवार व्ही .पी. सर यांनी कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
यानंतर रक्षाबंधनाचे महत्व हे  काळाची गरज आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना श्री सदलगे  एस .व्ही.सरानी करून दिली . कार्यक्रमाला शाळेचे  प्रभारी मुख्याध्यापक श्री आतर एस .बी . श्री . सदलगे एस व्ही . श्री .पवार व्ही .पी. श्री जाधव आर .एन . श्री . कार्लेकर एच .आर व सर्व विद्यार्थानी विद्यार्थी उपस्थित  होते
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत