वेंगुर्ले नगर परिषदेत बिन भिंतीचे शौचालय

वेंगुर्ले : रायगड माझा 

वेंगुर्ले नगर परिषद हद्दीतील निमुसगा भागातील कातकरी वस्तीत दोन अर्धवट शौचालये बांधण्यात आलेली आहेत. शौचालय सीटच्या वर बांधकाम केलेलेच नसल्याने त्याचा उपयोग कुणी करतच नाही. या बांधकामाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून स्वच्छ भारत अभियानात अग्रेसर असलेल्या वेंगुर्ले नगर परिषदेला जाब विचारला जात आहे.

वेंगुर्ले नगर परिषद हद्दीतील निमुसगा – दीपगृहानजीकच्या बीएसएनएल टॉवरनजीक गेली असंख्य वर्षे कातकरी २० कुटुंबांची झोपडय़ा असलेली वसाहत आहे. या वसाहतीत पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमच असते. या भागात सार्वजनिक विहिर नाही की नगर परिषदेची बोअरिंग, विहिरी, नळपाणी अधिकृत घरे वा वस्ती नसल्याने नळपाणी योजनेची पाईपलाईन गेलेली नाही. त्यामुळे दाभोसवाडा या सुमारे २ कि.मी.अंतरावरून पिण्यासाठी पाणी आणावे लागते.

कातकरी समाजाच्या या वस्तीत कुणीतरी दोन शौचालये सीटपुरती बांधकामे करून दिली. त्यासाठी ड्रेनेजकरिता खड्डासुद्धा मारलेला नाही व शौचालयात त्या सीटरवर बसणाऱया व्यक्तीस आडोसा राहील अशा भिंतीच बांधलेल्या नाही. सदर खड्डा व आडोसा स्वतःच तुम्ही करावयाचा आहे असे त्या शौचालये बांधून देणाऱयांनी स्पष्ट केले. ते नगर परिषदेची माणसे होती असे कातकरी महिला सावित्री वसंत पवार हिने पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.या उघडय़ा शौचालयांचा फोटो व्हॉट्सऍपवर व्हायरल झाल्याने वेंगुर्ले शहरात चर्चेला उधाण आलेले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत