वेगळ्या वळणावर जावू नका विकास फक्त राष्ट्रवादी पक्षच करणार :आ. अनिकेत तटकरेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

 म्हसळा : निकेश कोकचा 
आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांची जोरदार सभा स्थानिक स्वराज्य कोकण विभागाचे आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या अध्यक्षते खाली कोकण किनारपट्टीतील मध्यभाग समजला जाणारा व स्व बॅ.ए .आर अंतुले यांचे मूळ गाव असलेल्या आंबेत येथिल शासकीय विश्रामगृहात पार पडली.  यावेळी कार्यकत्याना मार्गदर्शन करताना, आपण कोणी वेगळ्या वळणावर जाऊ नका आपल्या विभागाचा विकास राष्ट्रवादीच करेल असा सल्ला देखील दिला. आंबेत खाडीपट्ट्यातील तसेच म्हसळा तालुक्यातील अनेक राष्ट्रवादी पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक बहुसंखेने उपस्थित होते.गेली पंधरा वर्षा पासून आंबेत ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सत्ता असताना आगामी काळात होणारी निवडणुकीवर राष्ट्रवादी आपला झेंडा फडकावल्या शिवाय  राहणार असे असे खंबीर वक्तव्य अनिकेत तटकरे यांनी या सभेमध्ये  केले.गेल्या पंचवीस ते तीस वर्षा पूर्वी स्व बॅ.ए.आर अंतुले यांनी कोकण विभागाचा काया पलट करण्यासाठी आतोनात मेहनत केली परंतु अपुऱ्या संधी च्या अभावी आंबेत खाडी पट्यातील विकासाची गती मंदावली आहे. यानंतर अनेक विकास कामे मार्गी लावताना अपुऱ्या अवस्थेत बॅ. अंतूले साहेब गेल्याने त्यांचे कोकण ला कॅलिफोर्निया करण्याचे राहिलेले स्वप्न आ. सुनिल तटकरे  व राष्ट्रवादी पक्ष पूर्ण केल्या शिवाय गप्प राहणार नाही असे सुचक विधान देखील यावेळी अनिकेत तटकरे यांनी केले.
   कोकण पट्ट्यातील रत्नागिरी कडून  रायगड दिशेला येताना लागणारे  मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच आंबेत गाव या आंबेत गावा पासूनच आगामी काळात होणाऱ् ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा विजय नक्कीच होईल आणि हाच विजय आंबेत पासून ते मंत्रालया पर्यंत पक्षाचा यशाचा दुवा असेल असेल, पक्षाने आतापर्यंत केलेल्या विकास कामांमुळेच पक्षाची आघाडी असल्याचे या वेळी अनिकेत तटकरे म्हणाले.म्हसळा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा असून खासदार गीते यांनी कोणत्या ग्रामपंचायती मध्ये विकासाचा झेंडा फडकवला आहे ते त्यांनी दाखून द्यावे.आता पर्यंतची गेलेली विकास कामांची निवेदने खासदार गीते यांनी केराच्या टोपलीतच टाकण्याचे काम केला असल्याच घनघाती आरोप तटकरे यांनी या सभे मध्ये केला.या वेळी या सभे मध्ये उपस्थित म्हसळा तालुका रा. कॉ. पक्षाचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी तसेच जि.प.सदस्य ,पंचायत समिती सभापती ,नगरध्यक्षा या व कार्यकर्ते बहुसंखेने उपस्थित होते.
आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा विजय निश्चितच झालेला आहे त्याचा मुख्य कारण म्हणजेच शिवसेनेचे दोन दिग्गज नेते राष्ट्रवादी पक्षाला मिळाले असल्याने आता राष्ट्रवादी पक्षाची ताकद दुप्पट झाली आहे.काही पक्षांच्या  माध्यमातून आता पर्यंत निवळ जातीचे राजकारण करून विकासाच्या भूमिकेला अडथला आणण्याचे काम काही विरोधक करत असल्याने काही गाव विकासापासून वंचित राहिलेली आहेत .परंतु अश्या गावांनी देखील चिंता करण्याची गरज नाही त्याच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष ठामपणे उभा असेल .
 रा.कॉ.पक्षाचे महाराष्ट्र अल्पसंख्यांक सेल  अध्यक्ष अली कौचाली
सुनिल तटकरे या विभागाचे आमदार झाल्यापासून आतापर्यंत अनेक विकास कामे त्यांनी मार्गी लाऊन जनतेच्या मनात एक आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. यामुळेच आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत जनता आ.तटकरेच्या पाठीमागे उभी असून  भरभरीत मतांनी ग्रामपंचायत सदस्यांना निवडून देऊन एक प्रकारची विजयाची भेट देणार हे निश्चित आहे
जयवंत सावंत-रा. कॉ. आंबेत गण अध्यक्ष
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत