व्हाट्सअॅपला पूर्ण झाली दहा वर्षे, दहा वर्षात झाले अनेक बदल

दिल्ली : रायगड माझा वृत्त 
Related image
भारतातात सगळ्यांना वेड लावणाऱ्या व्हाट्सअॅपला दहा वर्ष झाली आहेत. जे अॅप एकेकाळी फक्त आयफोन युजर्ससाठी तयार करण्यात आले होते ते आता घरोघरी पोहोचले आहे. या अॅपमध्ये गेल्या दहा वर्षांत भरपूर बदल झाले आहेत. गेल्या दहा वर्षांत जे बदल  झाले ते जाणून घेऊया.

वर्ष २००९

व्हाट्सअॅपची सुरुवात २००९मध्ये आयफोन आणि अॅंड्राइड युजर्ससाठी सुरू करण्यात आलं होतं. सुरुवातीला मॅसेजिंग अॅप म्हणून व्हाट्सअॅप लॉंच करण्यात आलं होतं. पण २००९ अखेरपर्यंत व्हाट्सअॅपमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगचे ऑप्शन्स देण्यात आले होते.

वर्षं २०१०
यावर्षी व्हाट्सअॅपमध्ये लोकेशन शेअरिंग अॅप देण्यात आलं होतं.

वर्ष २०१३ 
वर्ष २०१० नंतर व्हाट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात बदल २०१३ मध्ये करण्यात आले. यावर्षी व्हाट्सअॅप ग्रुप फिचरची निर्मिती करण्यात आली.

वर्ष २०१४ 
२०१४ मध्ये जगभरातील व्हाट्सअॅप युजर्सची संख्या ५० कोटी झाली. याशिवाय व्हाट्सअॅपने फेसबुकशी करारही केला. रिड रिसिप्ट्स फिचरही याचवर्षी तयार करण्यात आले.

वर्ष २०१५ 

यावर्षी व्हाट्सअॅप वेबची निर्मिती करण्यात आली. यानंतर डेस्कटॉपवरही व्हाट्सअॅप उघडण्यात येऊ लागले.

वर्ष २०१६ 
यावर्षी व्हाट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या १०० कोटीच्या पार गेली. यावर्षी व्हिडिओ कॉलिंग, एन्ड टू एन्ड एनक्रिपशन सारख्या सुविधा देण्यात आल्या.

वर्ष २०१७
यावर्षी व्हाट्सअॅप स्टेटस हे फिचर अॅड करण्यात आले.

वर्ष २०१८
यावर्षी व्हिडिओ ग्रुप कॉलिंग, व्हाट्सअॅप स्टिकर्स आणि व्हाट्सअॅप बिझनेस अॅप असे फिचर्स लाँच करण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत