व्हॅलेन्टाइन डे; दिवस प्रेमाचा, आज प्रेमाला मिळणार उजाळा

व्हॅलेंटाइन डे भारतीय तरुणाईला आवडणारा पाश्चात्त्य सण.

खोपोली : समाधान दिसले

14 फेब्रुवारीला ‘व्हेलेंटाईन डे’ साजरा करण्यात येतो. संत व्हेलेंटाईन यांच्या स्मरणार्थ ‘व्हेलेंटाईन डे’ साजरा केला जातो. सुरुवातीला हा दिवस ‘संत व्हेलेंटाईन दिन’ म्हणून हा दिवस साजरा केला जायचा, मात्र तद्नंतर प्रसिद्ध इंग्रजी लेखक जेफ्री चौसर यांच्या रचनांनुसार हा दिवस ‘प्रेम दिन’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. प्रत्येक वर्षी 7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत व्हेलेंटाईन वीक साजरा करण्यात येतो. परंतु व्हॅलेंटाइन डे आणि तरुणाई असं एक समीकरण झालं आहे. पण हे समीकरण पूर्णपणे बरोबर आहे असं नाही. कारण व्हॅलेंटाइन डे आता फक्त तरुणाईचा सण राहिलेला नाही; तर तो वयस्कर आणि मध्यमवयीन जोडप्यांचाही आनंदाचा भाग झालेला आहे. व्हॅलेंटाइन डे हा दिवस म्हणजे प्रेमी युगुलांसाठी जणू एक सणच बनल्याने या दिवसाला प्रेमाचा दिवस ही संबोधले जात असल्याने तरुणाईमध्ये या दिवशी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असुन व्हँलेन्टाइन डे प्रेम व्यक्त करण्याचा पाऊलवाट ही असे ही म्हटले तरी वावग ठरणार नाही.

अनेक जण या दिवसाची वर्ष भर आतुरतेने वाट बघत असतात. आपल्या प्रेयसी किंवा प्रियकरासोबत अनेकांना हा दिवस उत्साहात साजरा करायचा असतो. येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या प्रेमाचा असतो, असं म्हटलं तरी व्हॅलेंटाइन डे प्रेमात असलेल्या प्रत्येकाला महत्त्वाचाच वाटत असतो. हा दिवस त्यांना त्यांच्या हक्काचा वाटतो. या दिवसाचं औचित्य साधून काही जण त्यांचं प्रेम पुन्हा नव्याने खुलवत व्यक्त करतात. त्यामुळे आताच्या तरुणाईला हा दिवस हवाहवासा वाटत असतो, म्हणून या दिवसाला प्रेमाला दिवस असं ही म्हटलं जात. या दिवसाच्या निमित्ताने काही ठिकठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. हा दिवस खास तरुणांचा वाटत असला तरी तरुण नसलेल्या काही जोडप्यांसाठीसुद्धा तो महत्त्वाचा ठरतो. ही जोडपी हा दिवस साजरा करण्यासाठी त्याचं वय बघत नाहीत तर त्यांच्यातलं फक्त प्रेम बघतात. जसं त्यांच्या वयाचा आकडा त्यांना महत्त्वाचा वाटत नाही तसेच त्यांच्यातलं प्रेम किती जुनं, किती नवं हे गौण ठरतं, त्यांच्यासाठी प्रेम हे प्रेम असतं.

निखळ, निर्मळ, लग्नाला अनेक वर्ष उलटून गेलेली असतानाही आपल्या प्रेमाची पोचपावती देण्यासाठी अनेक वयस्कर जोडपी व्हॅलेंटाइन डे साजरा करतात. वयानुसार त्यांच्यातलं प्रेमही मोठं झालेलं असतं. लग्न झाल्यानंतर संसारात रमलेल्या अनेक जोडप्यांना एकमेकांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. कधी कधी काहीही न बोलता नुसतं एकमेकांसोबत असणं हेदेखील महत्त्वाचं असतं. पण अनेकदा तेही घडत नसतं. घर, संसार, आर्थिक परिस्थिती, मुलंबाळं या सगळ्या चक्रात व्यस्त असतात. पण याच चक्रातून बाहेर पडत एकमेकांना ठरवून वेळ देत, ठरवून एक अख्खा दिवस जोडीदारासोबत घालवत, एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त करत ते जोडपं त्यांच्यातलं प्रेम पुन्हा एकदा खुलवतात तो दिवस असतो व्हॅलेंटाइन डेचा. तरुणांप्रमाणेच तेही त्यांचं प्रेम व्यक्त करण्याची ही प्रेमळ संधी सोडत नाहीत. म्हणून प्रेमाच्या दुनियेत व्हँंलेंटाइन डे ला विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले आहे. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डे ला प्रेमाचा दिवस म्हणून संबोधले जाते. या दिवशी अनेक जण आपले प्रेम व्यक्त करीत आपल्या मनातील भावना आपल्या प्रिय व्यक्ती समोर मांडत असतात. मात्र काहीना हा दिवस हवाहवासा वाटला तरी काहीना दिवस फक्त एकतर्फी प्रेमाच्या आठवणीत काढावा लागत असतो, कारण की त्याच्या प्रिय व्यक्ती त्याचे प्रेम स्विकारलेले नसते.

परंतु अलीकडच्या काळात भारतीय तरुणाईला आवडणारा पाश्चात्त्य सण म्हणून व्हृँलेटाईन डे कडे पाहीले जात असले तरी, या डे ज् बाबत काहीमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे, काही आताची तरुणाई भारतीय संस्कृतीतील सणाकडे दुर्लक्ष करीत विदेशातून आलेल्या सणाचा मोठ्या गाजावाजा करीत साजरा करीत आहे. त्यामुळे भारतीय तरुणाईने आपल्या रुढी परंपरा जपणे काळाची गरज आहे, असे काही जाणकार व्यक्ती आपले मत व्यक्त करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत