व्हॉटस्ॲप भारतीय यूजर्ससाठी पेमेंट सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन

Image result for whats app pics

सोशल मीडियावरील लोकप्रिय मेसेजिंग ॲप असलेले व्हॉटस्ॲप आता भारतीय यूजर्ससाठी पेमेंट सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, अद्याप भारतीय रिझर्व्ह बँकेने  (आरबीआय) व्हॉटस्ॲपला पेमेंट सेवा देण्यासाठी परवानगी दिलेली नाही.

जगात ‘व्हॉटस्‌ॲप’चे १०० कोटी यूजर्स आहेत. त्यात २० कोटी भारतातील यूजर्सचा समावेश आहे. भारतातील यूजर्सची वाढती संख्या लक्षात घेऊन व्हॉटस्ॲप पेमेंट सेवा देणार आहे. व्हायरल होणाऱ्या फेक न्यूज आणि अफवांना रोखण्यासाठी ‘व्हॉटस्‌ॲप’चे सीईओ क्रिस डॅनिअल हे याआधी भारत भेटीवर येऊन गेले आहेत. तसेच व्हॉटस्‌ॲप भारतात कॉर्पोरेट ऑफिस सुरू करणार आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, ‘व्हॉटस्‌ॲप’ने प्रायोगिक तत्त्वावर १० लाख यूजर्संसाठी पेमेंट सेवेची चाचणी सुरू केली आहे. मात्र, अद्याप त्याला अधिकृत परवानगी दिलेली नाही. ही सुविधा सुरू करण्यासाठी ‘व्हॉटस्‌ॲप’ गेल्या दोन वर्षापासून सरकारशी संपर्क साधत आहे.

‘व्हॉटस्‌ॲप’चे सीईओ क्रिस डॅनिअल यांनी आरबीआयला पत्र लिहून भारतातील सर्व यूजर्संना पेमेंट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी परवानगी मागितली आहे. भारतातील १० लाख यूजर्संना व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी चाचणी केली जात आहे. यावर लोकांच्या प्रतिक्रिया सकारात्मक आहेत. लोक मेसेज प्रमाणे सामान्य आणि सुरक्षितरित्या आर्थिक व्यवहार करत आहेत, असा दावा व्हॉटस्ॲपने केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत