व्हॉट्सअॅपचं भन्नाट फिचर लाँच, ग्रूपमध्ये प्रायव्हेट रिप्लायचा ऑप्शन

 नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

 

जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप म्हणून व्हॉट्सअॅपने आपली ओळख बनवली आहे. वेळोवेळी नवनवे फिचर्स देऊन अपडेट राहिल्याने या अॅपला टक्कर नाही. आताही व्हॉट्सअॅपने प्राव्हेट रिप्लाय हे भन्नाट फिचर आणलं आहे.

व्हॉट्सअॅपवर ग्रूप चॅटिंग मोठ्या प्रमाणावर केलं जातं. हे ग्रूप चॅटिंग करताना एखाद्या व्यक्तीला त्याने टाकलेल्या मेसजसंदर्भात काही खासगीत सांगायचे झाल्यास आपल्याला ग्रूपमधून बाहेर येऊन त्याच्यासोबत पर्सनल चॅट करावी लागत होती. आता मात्र तसे करावे लागणार नाही. कारण ग्रूपमधील प्रायव्हेट रिप्लाय या ऑप्शनचा वापर करून लिहिलेला मेसेज हा फक्त त्याच व्यक्तीला वाचता येईल, ग्रूपमधील अन्य व्यक्तींना तो मेसेज दिसणार नाही.

दरम्यान, व्हॉट्सअॅपवर सध्या स्टिकर्सची सुरुवात झाली असून दिवाळीच्या शुभेच्छांच्या निमित्ताने त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत