व्हॉट्सअॅपचे हे फीचर आता फेसबुकवरही…

रायगड माझा ऑनलाईन :

Image result for messenger

फेसबुक या जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅप्लिकेशनद्वारे ग्राहकांना एक नवीन सुविधा देण्यात येणार आहे. युजर्सचा वापर जास्तीत जास्त सोपा व्हावा यासाठी कंपनी कायमच प्रयत्नशील असते. व्हॉट्सअॅपवर ज्याप्रमाणे तुम्ही एखादा मेसेज केला आणि तो तुम्हाला डिलीट करायचा असेल तर डिलीट फॉर एव्हरीवन करण्याची सुविधा आहे. त्याचप्रमाणे फेसबुकही मेसेंजरद्वारे आपल्या युजर्सना ही सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे तुम्ही चुकीने एखादा मेसेज दुसऱ्या कोणाला पाठवला, किंवा जो मेसेज पाठविल्यानंतर तो चुकीचा आहे असे तुम्हाला वाटले तर तो डिलीट करण्याचा पर्याय तुम्हाला उपलब्ध असणार आहे. हे फीचर येत्या काही महिन्यात लाँच होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

अशाप्रकारे एकदा केलेला मेसेज डिलीट करता येणार असला तरी ज्यांना तो मेसेज पोहोचला आहे त्यांना तो डिलीट केला तरीही दिसणार आहे. यासाठी मेसेंजरमध्ये अनसेंड असे एक बटण देण्यात येणार आहे. आता नेमका कीती वेळात मेसेज डिलीट केला की तो दिसणार नाही याबाबत मात्र अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. हे फीचर सहा महिने आधीच तयार केले होते. मार्क झकरबर्ग याने एप्रिल महिन्यात स्वत: हे फीचर वापरले होते तेव्हा हे फिचर चर्चेत आले. फेसबुकचीच मालकी असलेल्या इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट या अॅप्लिकेशन्ससाठीही हे फीचर उपलब्ध आहे. मेसेज अनसेंड म्हटल्यावरही एकदा कन्फर्मेशन घेतले जाणार आहे. त्यामुळे फेसबुक मेसेंजरवर व्हॉट्सअॅपप्रमाणे ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत