व्हॉट्सअॅपवर टाईपऐवजी बोलून पाठवता येणार मेसेज

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

Image result for whatsapp pic
व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करण्यासाठी आता टाईप करण्याची गरज नाही. व्हॉट्सअॅपवर बोलूनही मेसेज पाठवता येणार आहे. व्हॉट्सअॅपच्या डिक्टशन फीचरच्या मदतीने टाईपविना मेसेज पाठवता येणार आहे. हे फीचर अँड्रॉयड आणि आयओएस या दोन्ही मोबाइल वापरणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध आहे.

कीबोर्डमध्ये माइकचा आयकॉन देण्यात आला आहे. डिक्टशन फीचर हे गुगल असिस्टेंट आणि सिरी यासारख्या व्हॉइस असिस्टेंट्समध्ये आधीपासूनच आहे. व्हॉट्सअॅपमध्ये हे फीचर आता बिल्ट-इन आहे. कोणताही युजर्स कीबोर्डमधून दिलेल्या माईकला क्लिक करून जे बोलायचे ते मेसेजद्वारा दुसऱ्याला पाठवू शकतो. Dictation फीचर्सचा वापर करण्यासाठी युजरला सर्वात आधी व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल. त्यानंतर कॉन्टॅक्टवर क्लिक करून ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे. त्याला तो पाठवू शकणार आहे. कॉन्टॅक्ट (ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा) वर क्लिक केल्यानंतर कीबोर्ड ओपन करा.

टाइप करण्यासाठी जसा करतो तसा अँड्रॉयड मोबाइलच्या युजर्सला व्हॉट्सअॅपवर काळ्या रंगाचा माइक वरच्या बाजुला दिसेल. तर आयओएस युजर्सला हा माइक खालच्या भागाला दिसेल. मेसेज पाठवण्यासाठी माइकवर क्लिक करा. त्यानंतर जो मेसेज पाठवायचा आहे ते अगदी मनमोकळेपणाने बोला. ज्या भाषेत तुम्ही बोलाल त्या भाषेत तो मेसेज आपोआप टाइप होईल. मेसेज पूर्ण झाल्यानंतर सेंड बटनवर क्लिक करून तो पाठवता येऊ शकतो. जर तुम्हाला वाटले की, काही तरी चुकीचे बोललो आहे तर घाबरून जाण्याची गरज नाही यात एडिटचा पर्याय सुद्धा देण्यात आला आहे. हे फीचर मोठा मेसेज पाठवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. मोठा मेसेज टाईप करण्यासाठी खूप वेळ लागतो. परंतु, ही अडचण आता दूर होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत