शरद केळकर म्हणाला; ‘छत्रपती शिवाजी महाराज’ म्हणा…

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

अजय देवगणची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या पत्रकाराला शरद केळकरने पत्रकार परिषद मधेच थांबवत तिची चूक लक्षात आणून दिली.’तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित ट्रेलर बुधवारी प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर चित्रपटाच्या कलाकारांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटात अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटाती भूमिकेविषयी प्रश्न विचारण्यात आले. या दरम्यान एका पत्रकारानं प्रश्न विचारताना शिवाजी महाराजांचा केवळ शिवाजी असा एकेरी उल्लेख केला. त्यावेळी शरद केळकरनं प्रश्न मधेच तोडत अतिशय नम्रपणे त्या पत्रकाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा उल्लेख करायला सांगितलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत