शरद पवारांची आझाद मैदानात एन्ट्री; शेतकरी मोर्चाला पाठिंबा

Sharad Pawar: Latest News, Photos and Videos on Sharad Pawar - ABP Majha

महाराष्ट्र News 24

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. रविवारी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती. आजही मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन सुरू असताना आता दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं आहे.

अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झालेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आझाद मैदानात दाखल झाले आहेत. दरम्यान, याच वेळी पवारांनी आपलंही म्हणणं ऐकून घ्यावं म्हणून मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘पवार साहेब, इकडेही लक्ष द्या’, असा मजकूर लिहिलेले पोस्टर आणि बॅनर्स आझाद मैदानात झळकवले होते. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झालेत. सर्वस्तरावरून या आंदोलनाला पाठिंबा मिळताना दिसतोय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत