शरद पवारांना धक्का, तारिक अन्वर यांची राष्ट्रवादीला सोडचिट्ठी

रायगड माझा वृत्त 

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य सरचिटणीस तारिक अन्वर आणि पक्ष सदस्यत्वाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला आहे. राफेल विमान व्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बाजू घेतल्याने नाराज झालेल्या अन्वर यांनी अचानक राजीनामा दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. शरद पवार यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

View image on Twitter

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेत तारिक अन्वर यांचा मोठा वाटा आहे. पक्ष नेतृत्वाबरोबर मतभेद झाल्यानंतर शरद पवारांबरोबर काँग्रेस सोडलेल्या मोजक्या नेत्यांपैकी ते एक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यात शरद पवार, दिवंगत नेते पी ए संगमा आणि तारिक अन्वर यांची भूमिका महत्वाची होती. राष्ट्रवादीचा ते उत्तर भारतातील प्रमुख चेहरा होते. परंतु, त्यांनीच राजीनामा दिल्याने हा पक्षाला मोठा धक्का आहे.

काय म्हणाले होते शरद पवार..

लोकांना नरेंद्र मोदींच्या उद्देशावर शंका नसल्याचे पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले होते. हा काँग्रेस नेत्यांच्या नाही तर निर्णय घेताना त्यात सहभागी झालेल्यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. लोकांना काय वाटते याचा आहे. लोकांना मोदींच्या उद्देशावर शंका नाही. सुरुवातीला निर्मला सीतारमन माहिती देत होत्या. आता अरुण जेटलींनी त्यांची जागा घेतली आहे. करारातील महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली नाही असे दिसत आहे. ज्याप्रकारे माहिती सादर करण्यात आली त्यावरुन शंका उपस्थित झाल्या आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत