शहिद मेजर कौस्तुभ राणे यांचे हरिहरेश्वर येथे अस्थिविसर्जन!

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार

शहिद जवान मेजर कौस्तुभ राणे यांच्या अस्थींचे आज, मंगळवारी, ता 21 रोजी श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहरेश्वर मध्ये विसर्जन करण्यात आले. 

शहीद जवान मेजर कौस्तुभ प्रकार राणे यांच्या अस्थी कलशाचे विधीवत पूजन करून दक्षिण काशी श्री क्षेत्र हरिहरेश्वर ह्या पवित्र  देवभूमीत त्यांच्या पवित्र अस्थींचे चे विसर्जन करण्यात आले. यावेळी त्यांच्या आई ज्योती राणे,  वडील प्रकाश राणे , मुलगा अगस्त्य राणे विरपत्नी कनिका कौस्तुभ राणे, त्याचे सासु , सासरे ,काका , काकी ,मेव्हणा ,मामा ,चुलत भाऊ मावस भाऊ असा परिवार उपस्थित होता.  हरिहरेश्वर येथील स्थानिक मंडळी सुयोग लांगी , सचिन गुरव , जितेश भोसले ,अमर तोडणकर , विक्रांत गोगरकर , नितेश , दिलीप देवकर , चैलेंज पोलेकर , अभय पोलेकर , नितीन बोडस आदींनी भावपूर्ण वातावरणात ‘मेजर कौस्तुभ राणे अमर रहे’च्या घोषणा देत,  त्याच्या पवित्र  अस्थींना शोक अनावर होउन आखेरचा निरोप दिला .

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत