शहिद योगेश भदाणे यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार

जम्मू काश्मीरच्या सुंदरबन सेक्टरमध्ये पाकिस्ताने केलेल्या गोळीबाराला प्रतिउत्तर देताना धुळे जिल्ह्यातील जवान योगेश भदाणे शहिद झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सोमवारी दुपारी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आज शहिद योगेश यांचे पार्थिव दिल्लीला आणले जाणार आहे. तेथून हे पार्थिव नाशिक अथवा औरंगाबाद येथे आणले जाणार आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांच्याकडून सैन्यदलाचे विमान थेट धुळ्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डॉ भामरे स्वतः जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. खलाने गावातील रस्त्या लगत एका शेतात शहिद योगेश यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. संपूर्ण खलाने गाव दुःखसागरात बुडाले असले तरी शाहिद योगेश याला अमरत्वाचे जे वरदान मिळाले त्यासाठी गावात अंत्ययात्रा देशाभिमान दाखवणारी काढली जाणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत