शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या कुटुंबीयांना अमिताभ यांची ५ लाखांची मदत

मुंबई : रायगड माझा वृत्त 

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याने देश हादरलाय. बॉलिवूडमधूनही या हल्ल्याचा तीव्र निषेध होतोय. तसंच शहिदांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात येतेय. आता महानायक अमिताभ बच्चन हे शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावले आहेत. शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या कुटुंबीयांना अमिताभ हे ५ लाखाची मदत देणार आहेत. 

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना जागेवरच वीरमरण आले. या घटनेतील प्रत्येक शहीद जवानाच्या कुटुंबीयांना अमिताभ बच्चन हे पाच लाखांची मदत देणार आहेत. ही मदत शहीद जवानांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. याधी अमिताभ यांनी क्रिकेटपटू विराट कोहली याच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला होता. यामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत