शहीद भगतसिंग यांना दहशतवादी म्हणणाऱ्या प्रोफेसरची हकालपट्टी

श्रीनगर : रायगड माझा वृत्त 

ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत फाशी देण्यात आलेल्या महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना दहशतवादी बोलणाऱ्या प्रोफेसरची हकालपट्टी करण्यात आली आहे. जम्मू विद्यापिठाचे प्रोफेसर मोहम्मद ताजुद्दीन यांनी शहीत भगतसिंग यांना दहशतवादी म्हटले होते. यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली. जोपर्यंत तपासअधिकाऱ्यांची समिती कोणताही निर्णय घेत नाही तोपर्यंत ताजुद्दीन यांना शिकवता येणार नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.

प्रोफेसर एम ताजुद्दीन क्लासमध्ये लेक्चर देत असताना त्यांनी महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना ‘हिरो’ नाही तर दहशतवादी असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यावर क्लासमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला व प्रोफेसरवर देशभावनेला ठेस पोहोचवल्याचा आरोप लगावत त्यांची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडे केली. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर विद्यापीठ प्रशासनाने या घटनेचे चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे.

दरम्यान या आरोपांवर प्रतिक्रिया देताना प्रोफेसर ताजुद्दीन म्हणाले की, ‘मी स्वत: शहीद भगदसिंह यांना एक महान क्रांतिकारी मानतो. देशासाठी आपले सर्वस्व अर्पन करणाऱ्यांपैकी ते एक आहेत. माझ्या लेक्चरचा चुकीचा अर्थ काढण्य़ात आला आहे. माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे.’ तसेच मी रशियाचे क्रांतिकारक लेनिन यांच्यासंबंधीत माहिती देत असताना राज्यात कोणत्याही प्रकारची हिंसा उसळल्यास त्याला दहशतवाद म्हणायला हवे असे ते म्हणाले. भगतसिंग यांना दहशतवादी म्हणण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. मी त्यांचा सन्मान करतो. जर माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो, असेही ते म्हणाले.

 

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत