शाओमी भारतात लाँच करणार ६५ इंचाची एलईडी टीव्ही

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

ऑनलाइन टीव्ही विक्रीत नंबर वन असलेली शाओमी कंपनी लवकरच (Xioami MI TV) ६५ इंचाची एलईडी टीव्ही लाँच करणार आहे. शाओमीनं याआधी ३२ इंचाची टीव्ही भारतीय बाजारात लाँच केली होती व याला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला होता.

शाओमीनं नुकतेच एक ट्विट केले आहे. १४ फेब्रुवारी २०१८ रोजी भारतात पहिल्यांदा टीव्ही लाँच केली व इतर टीव्हीच्या तुलनेत आम्ही खूप पुढे गेलो. आम्ही इथेच थांबणार नाहीयेत. TheBiggerPicture Coming soon. Stay Tuned!’ असं या ट्विटमध्ये शाओमीनं म्हटलंय. यावरुन हे स्पष्ट होतंय की, शाओमी लवकरच एक मोठ्य़ा स्क्रीनची टीव्ही लाँच करण्याची तयारी करीत आहे. शाओमीनं चीनमध्ये नुकतीच ६५ इंचाची (Mi TV 4) टीव्ही लाँच केली आहे, यावरून शाओमी भारतातही ६५ इंचाची टीव्ही लाँच करण्याची शक्यता आहे.
आयडीसीच्या एका अहवालानुसार, २०१८ च्या दुसऱ्या तिमाहीत शाओमी टीव्ही विक्रीत नंबर वनवर आहे. केवळ नऊ महिन्यात १० लाख टीव्हीची विक्री झाली असून ऑनलाइनमध्ये सर्वाधिक टीव्ही विक्री करणारी कंपनी नंबर वन बनली आहे, असा दावा शाओमीनं केला आहे. भारतीय ग्राहक एमआय एलईडी टीव्हीला पंसत करत असून ही ऑनलाइन ब्रांड बनल्याचे कंपनीनं म्हटलं आहे. शाओमीनं नुकतच Mi TV 4 Pro 55 इंचाची टीव्ही लाँच केली होती. Mi LED TV 4A Pro 49 इंच आणि Mi LED TV 4C Pro 32 ही सुद्धा लाँच केली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत