शाओमी रेडमी 6 खरेदीवर आज मिळतोय कॅशबॅक!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

शाओमी रेडमी 6 खरेदीवर आज मिळतोय कॅशबॅक

बजेट फोन म्हणून प्रसिद्ध असलेला रेड मी 6 स्मार्टफोनचा सेल 12 वाजता सुरू झालायं. फ्लिपकार्ट किंवा Mi.com या कंपनीच्या वेबसाईटवरून हा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करू शकता. 14 नोव्हेंबरला रेड मी 6 चा फ्लॅश सेल होता पण आता फोन ओपन सेलमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोन खरेदीवर तुम्हाला 1 हजार 800 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक तसेच 240 जीबी डेटा देखील मिळणार आहे.

3 जीबी रॅम आणि 32 जीबी मेमरी वाला फोन 8 हजार 499 रुपयांमध्ये मिळतोय.  64 जीबी इंटरनल मेमरी असलेला फोन9 हजार 499 रुपयांत मिळतोय.

स्पेसिफिकेशन्स 

अॅण्ड्रॉईड एंड्रॉइड 8.1 ओरियो बेस्ड MIUI वर चालतो.

18.9 एस्पेक्ट रेश्यो सहित 5,45 इंच HD +(720×1440 पिक्सल) डिस्प्ले

3 जीबी रॅमसहित 2GHz ऑक्टा-कोर 12nm MediaTek Helio P22 प्रोसेसर

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये रियर ड्युअल कॅमेरा सेटअप दिला गेलाय. याचा पहिला कॅमेरा 12 मेगा पिक्सल तर दूसरा कॅमेरा 5 मेगापिक्सल आहे. तर फ्रंटला सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल कॅमेरा दिला गेलायं.

याची इंटरनल मेमरी 32GB/ 64GB असून कार्ड च्या मदतीने ती वाढवता येऊ शकते. कनेक्टिविटीसाठी यामध्ये  4G LTE, ब्लूटूथ 5.0, Wi-Fi, GPS/ A-GPS, एक 3.5mm हेडफोन जॅक आणि मायक्रो USB सपोर्ट देण्यात आलाय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत