शालेय पोषण आहारातून ३५ विद्यार्थ्यांना विषबाधा

खेड : रायगड माझा वृत्त 

खेड तालुक्‍यातील कळंबणी बुद्रुक गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक एकमध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत खिचडी-आमटीचे जेवण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोटात दुखू लागले आणि ३५ विद्यार्थ्यांना उलट्या-जुलाब सुरू झाले.

पारस धोडू चिंचघरकर (११), वैष्णवी संतोष हंबीर (१०), अंकुश मनोहर जोशी (९), सानिका प्रकाश मोरे (११), देविका प्रवीण देवघरकर (९), समर्थ सतीश सुतार (८), स्नेहा सुनील बाईत (९),  सामीध्य मंगेश सुतार (९), रोहन एकनाथ देवघरकर (१२), साई सतीश सुतार (१३) या दहा विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती तेथील वैद्यकीय सूत्रांनी दिली.

घटनेची माहिती समजताच सभापती सौ. नक्षे, सरपंच शोभा पाटणे, जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. पाटणे, माजी आरोग्य सभापती चंद्रकांत कदम, तालुकाप्रमुख राजा बेलोसे, गटशिक्षणाधिकारी विजय बाईत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आदींनी रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर डॉ. पालकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ उपचार सुरू करुन २५ विद्यार्थ्यांना उपचार करून घरी पाठविले आहे; तर दहा विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, त्यांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे.

 

दोषींवर कारवाई होणार
शालेय पोषण आहार व पिण्याच्या पाण्याचे नमुने घेऊन ते तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मकरंद जाधव यांनी दिली. शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सभापती अपर्णा नक्षे आणि डॉ. मकरंद जाधव यांनी सांगितले. तसेच, शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या संबंधित एजन्सीचीही चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत