शाळांमध्ये जबरदस्ती पक्षाचा प्रचार करण्याचा भाजपचा प्रयत्न- राष्ट्रवादी काँग्रेस

रायगड माझा  वृत्त 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘चलो जीते हैं’ हा लघुपट राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखवण्यात येणार आहे. राज्य शासनाने असा निर्णय घेतला असून जिल्हाप्रमुख, शिक्षणाधिकाऱ्यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शिक्षकांना आदेश दिले आहेत. दरम्यान, भाजप प्रचारासाठी शाळांचा उपयोग करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आता घसरत चालली आहे. एखाद्या पक्षाच्या प्रचारासाठी शाळांचा उपयोग करणे योग्य नाही. शाळा प्रशासनाने या आदेशाचा कडाडून विरोध करायला हवा.

पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ हा लघुपट दाखवण्याचा नवा ‘फतवा’ महाराष्ट्रातील शाळांसाठी काढण्यात आला आहे. भाजप आता जोरजबदस्तीवर आली असून शाळांमध्ये जबरदस्ती पक्ष प्रचार करण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जात असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत