शाळेंची मैदाने खुली करा सिडकोची फलक बाजी, मैदाना भोवती भिंतीचे अतिक्रमण

शाळेंची मैदाने खुली करा; सिडकोने दिले शैक्षणिक संस्थांना आदेश

  • मैदानाभोवती शैक्षणिक संस्थांनी बांधलेत वाँल कंपाऊंड
  • संस्थांच्या मैदानावर सर्वसामान्य खेळाडूंना खेळू द्या!

 पनवेल : शैलेश चव्हाण

सिडको हद्दीतील शहरातींल शाळा काँलेजांनी आपल्या आवारातील मैदाने हि शाळांच्या सुट्टीच्या दिवशी सर्वसामान्यांना खुली करुन द्यावीत अशा सुचना सिडकोने शाळांच्या मैदाना बाहेर लावल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य क्रिडा प्रेमींना दिलासा मिळाला आहे. मात्र वस्तुस्थिती पाहता ही मैदाने चक्क बळकावण्याचा प्रयत्न शैक्षणिक संस्थांनी केलेला आहे. त्यामुळे ही मैदाने सिडकोच्या फलक बाजीमुळे मोकळी होणार आहेत का? असा सवाल सर्व स्थरातुन विचारला जात आहे.
पनवेलसह कळंबोलीतील बड्या शाळांनी या मैदानांना पक्या स्वरुपाचे वाँल कंपाऊंड उभारुन गेटला कुलुप लावलेले आहे. अशा वेळी या मैदानात शालेय सुट्टीच्या वेळी सर्व सामान्य खेळाडूंना आत परवानगी मिळत नसल्याचा प्रकार सुरु आहे तर हे वाँल कंपाऊंड विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीतुन उभारण्यात आल्याचे संस्था सांगत आहेत.
मात्र लग्नकार्य, राजकिय सभा, सांस्कृतीक कार्यक्रमासाठी हि मैदाने भाड्याने दिली जात आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्था भाडे मिळण्यासाठी आपली मैदाने कार्यक्रमासाठी देत आहेत,मात्र खेळाडूंना खेळण्यासाठी देत नसल्याचा आरोप येथील खेळाडू सांगत आहेत.

कळंबोली, कामोठे सह इतर सिडको नोड मधील शालेय पटांगणे हि सुट्टी दिवशी सर्व सामान्यांना मोकळी करुन द्यावी अशी अट असताना देखिल त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे शैक्षणिक संस्था सिडकोची दिशाभुल करत असून सिडकोने घेतलेला निर्णय संस्था पाळतात का याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत