शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल येथे मुलींसाठी स्व-संरक्षणाचे धडे

खोपोली : समाधान दिसले

शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल येथे दिनांक २४ व २५ आॅक्टोबर २०१८ रोजी मुलींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. इम्पावरमेंट बटरफ्लाईस ट्रेंनिंग अॅन्ड रिसर्च अकॅडमीचे कपिल पाल यांच्याकडून बी.एड विद्यार्थीनींना विविध स्व-रक्षणाचे प्रकार शिकविण्यात आले. यामध्ये प्राथमिक व्यायामाचे प्रकार, हॅण्ड होल्डिंग टेक्निक, बाॅडी होल्डिंग टेक्निक, हेअर होल्डिंग टेक्निकसह इतर डिफेन्ससाठीचे आवश्यक प्रात्याक्षिके प्रशिक्षणा अंतर्गत देण्यात आली.
मुंबई विद्यापीठाने एका परिपत्रकाव्दारे सर्व महाविद्यालयात मुलींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण आयोजित करण्याचे सूचित केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेलने डॉ. संध्या खेडेकर संचालित इम्पावरमेंट बटरफ्लाईस ट्रेंनिंग अॅन्ड रिसर्च अकॅडमी यांच्याव्दारे दोन दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याचा लाभ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी घेतला. प्रशिक्षणामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढीस लागला . तसेच आमच्या आयुष्यात असा संघर्षाचा प्रसंग उद्भवला तर न डगमगता स्व-संरक्षणाकरीता सज्ज राहू असा विश्वास यावेळी विद्यार्थ्यींनीनी व्यक्त केला. या प्रशिक्षणाचे उद्घाटन प्राचार्या डॉ.रमा भोसले यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. सुनिता लोंढे यांनी महाविद्यालयाच्यावतीने उत्तमरीत्या केले तर कार्यक्रमात डॉ. सुविद्या सरवणकर, डॉ.प्रमोद जोशी, प्रा.मीना भारती, प्रा.रमेश भोसले आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत