शासन निर्णयाला बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीने दाखवली केराची टोपली!

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार 

बोर्लीपंचतन ग्रामपंचायत

 

श्रीवर्धन तालुक्यातील सर्वात मोठी असलेली बोर्लीपंचतन ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या घर क्र.५३१,५३२, व ८२४  अशी अनुक्रमे घरे मनोहर रामचंद्र सुर्वे व श्रीमती जोष्ना जनार्दन सुर्वे अशी असेसमेंट सदरी नावे दाखल असुन ग्रामपंचायतीकडे वारंवार अर्ज करून व संमती पत्र देऊन विभक्त असेसमेंट मिळावे असे वारंवार अर्ज देऊन ही ग्रामपंचायत याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आरोप सुर्वे यांनी प्रतिनिधीशी बोलताना  सांगितले.
सदर विषयी संदर्भात गट विकास अधिकारी श्रीवर्धन यांच्याकडे सुर्वे यांनी माहिती मागितली असता.शासन परिपत्रकानुसार परिपत्रक  १८/०७/२०१६ च्या परिपत्रका नुसार ग्रामपंचायत हद्दीत ज्या इमारतीचे विहीत पद्धतीने बांधकाम परवानगी घेतली असो अथवा नसो अशा इमारतीची ग्रामपंचायतीकडील नमुना न. ८ म्हणजेच कर आकारणी नोंद घेण्यात येऊन विहीत पद्धतीने कर आकारणी करून कर वसुलिची कार्यवाही करण्यात यावी असे परिपत्रकात नमुद असताना ग्रामपंचायतीने मात्र स्वताहून ४ ते ५ वर्षांचा कर वसूल न केल्याने ग्रामपंचायतीचा आर्थिक नुकसान झाल्याचा  आरोप मनोहर रामचंद्र सुर्वे यांनी केला आहे. वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार करून ग्रामपंचायत वेळकाढूपणा करत असुन त्यामुळे मला मानसिक त्रास देण्याचा कळस ग्रामपंचायतीने रचला असुन शासनाच्या निर्णय प्रतीकेचा अवमान केल्याचे सुर्वे यांनी सांगितले.
सदर मिळकतीचा वाद कोर्टात प्रलंबित असल्यामुळे ग्रामपंचायती कडुन रीतसर करआकारणी करून असेसमेंट दिले जाणार नाहीत.तरी सुद्धा वादग्रस्त दोनीही कुटुंबाची  एकत्र मीटिंग ग्रामपंचायतमधे घेतली असता मनोहर सुर्वे हे त्यांची बाजु सांगण्यासाठी उपस्थित राहिले नाहीत. – गणेश पाटील सरपंच बोर्लीपंचतन ग्रामपंचायत
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत