शिक्षकांनी विद्यार्थ्याना शिकवले निसर्ग प्रेमाचे धडे

रायगड जिल्हा परिषदेच्या चिरगाव शाळेतील विदयार्थ्यानी अनुभवला एक उनाड दिवस

म्हसळा : निकेश कोकचा
म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या चिरगाव या शाळेतील विद्यार्थ्याना आपल्या परिसरातील निसर्गाबद्दल प्रेम निर्माण व्हावे यासाठी एक दिवसीय  जंगलामध्ये उनाड सहलीचे आयोजन करण्यात आल्याने विद्यार्थाच्या ज्ञानात भर टाकण्याचे काम शिक्षकांनी केला आहे.
तालुक्यातील मौजे चिरगाव येथिल जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिकणाऱ्या ४२ विद्यार्थ्यानी बुधवार दि. ६ मार्च रोजी निघालेल्या या एक दिवसीय उनाड सहलीत सहभाग घेतला होता. या सहलीमध्ये मुख्याध्यापक विलास सुटेसर, शिक्षक विक्रम पवार सर, अमित महागावकर सर व मच्छींद खेमनार सर, शाळा व्यवस्यापन समिती सदस्य  यांनी आपला सहभाग नोंदवला होता. सर्व शिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्याना निसर्गा विषयी प्रेम,आपुलकी, निसर्गातील विविध घटकांची ओळख व पुस्तक विरहीत भौगोलिक ज्ञानाची माहिती देण्यात आली. या उनाड दिवसामध्ये विद्यार्थ्यानी भौगोलिक व नैसर्गिक ज्ञाना व्यतीरिक्त जलतरण, मैदानी खेळांचाही थरारक अनुभव घेतला. या एकदिवसीय उनाड सहली मुळे विद्यार्थ्यामध्ये निसर्गप्रेम निर्माण करण्याचे काम शिक्षकांनी केले असल्याची माहिती शिक्षक विक्रम पवार यांनी दिली.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत