शिक्षकाने केलल्या मारहाणीत विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका

पुणे : रायगड माझा वृत्त 

Image result for punishment to students

दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी दिलेला गृहपाठ पुर्ण न केल्यामुळे एसएसपीएमएस या सैनिकी शाळेतील इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांला शिक्षिकाने अमानुष मारहाण केली. या मारहाणीमुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या शरीराची एक बाजूला अर्धांगवायूचा झटका बसला असून त्याचा एक डोळा कायमचा निकामी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

दिवाळीची सुट्टी सुरु होण्यापूर्वी शाळेतील शिक्षकांनी दिलेला गृहपाठ पूर्ण झाला आहे की नाही, हे तपासले जाते. त्यात चित्रकला शिक्षक संदिप गाडे यांनी संबंधित विद्यार्थ्यांचा गृहपाठ अपूर्ण असल्यामुळे त्याला जबर मारहाण केली. बेंचवर हात ठेवून जोराने मारले. एवढेच नाही, तर बोटाच्या हाडांनी डोक्‍यावर मारले, पोटालाही चिमटे काढले. या मारहाणीमुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या शरीराची एक बाजू अधू झाली आहे, असे पालकांनी सांगितले.

मुळचा बारामती येथील असणाऱ्या या विद्यार्थ्यांचे पालक त्याला सुट्टीत घरी नेण्यासाठी तीन नोव्हेंबरला सायंकाळी शाळेत आले. त्यावेळीही त्याला हसताना, बोलताना त्रास होत असल्याचे जाणवले. परंतु त्यानंतर दोन-तीन दिवसांनी संबंधित विद्यार्थ्यांचा एक डोळा झोपेतही उघडा राहत असल्याचे आणि त्याला हसताना, बोलताना प्रचंड त्रास होत असल्याचे जाणवले. त्यामुळे बारामती येथील रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञांकडे पालकांनी त्याला नेले. त्यावेळी अर्धांगवायूचा झटका बसल्याची शक्‍यता संबंधित डॉक्‍टरांनी वर्तविली आणि पुढील उपचारासाठी पुण्यात जाण्यास सांगितले. संबंधित विद्यार्थ्यावर लवकरच पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होणार आहेत. परंतु अमानुषपणे विद्यार्थ्याला मारणाऱ्या शिक्षकाला निलंबित करण्यात यावे, असे पालकांचे म्हणणे आहे. या विद्यार्थ्याच्या पालकांनी सोमवारी शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी संबंधित शिक्षिकावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन पाटील यांनी दिले. विद्यार्थ्यांचे पालक लवकरच शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणाची तक्रार नोंदविणार आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत